crop insurance महाराष्ट्रातील कृषी विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1,700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. दिवाळीपूर्वीच ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.
या योजनेंतर्गत विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अग्रीम वितरण होणार आहे. प्रमुख जिल्ह्यांमध्ये बीड, धाराशिव, परभणी, लातूर ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळणार आहे.
याबाबत माहिती देताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम रक्कम वितरण केली जाणार आहे. हा विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.”
या योजनेंतर्गत महाराष्ट्रात:
- एकूण लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303
- मंजूर एकूण रक्कम – 1,700 कोटी 73 लाख रुपये
प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार्या अग्रीम पिक विमा रक्कमेची तपशीलवार माहिती:
- नाशिक – 3.5 लाख शेतकर्यांना 155.74 कोटी रु.
- बीड – 7,70,574 शेतकर्यांना 241.21 कोटी रु.
- बुलडाणा – 36,358 शेतकर्यांना 18.39 कोटी रु.
- जळगाव – 16,921 शेतकर्यांना 4.88 कोटी रु.
- अहमदनगर – 2,31,831 शेतकर्यांना 160.28 कोटी रु.
- सोलापूर – 1,82,534 शेतकर्यांना 111.41 कोटी रु.
- सातारा – 40,406 शेतकर्यांना 6.74 कोटी रु.
- सांगली – 98,372 शेतकर्यांना 22.04 कोटी रु.
- धाराशिव – 4,98,720 शेतकर्यांना 218.85 कोटी रु.
- अकोला – 1,77,253 शेतकर्यांना 97.29 कोटी रु.
- कोल्हापूर – 228 शेतकर्यांना 13 लाख रु.
- जालना – 3,70,625 शेतकर्यांना 160.48 कोटी रु.
- परभणी – 4,41,970 शेतकर्यांना 206.11 कोटी रु.
- नागपूर – 63,422 शेतकर्यांना 52.21 कोटी रु.
- लातूर – 2,19,535 शेतकर्यांना 244.87 कोटी रु.
- अमरावती – 10,265 शेतकर्यांना 8 लाख रु.
हा अग्रीम पीक विमा लाभ प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्यांना देण्यात येत आहे. हे पैसे दिवाळी पूर्वीच शेतकर्यांच्या बॅंक खात्यात जमा होतील. या योजनेचा सर्वोत्तम फायदा घेण्यासाठी शेतकर्यांनी आपल्या बॅंक खाती अद्ययावत ठेवणे महत्वाचे आहे.