free 3 gas cylinders महाराष्ट्र राज्य सरकारने दाप्रदिक्षित गरीब कुटुंबांना आर्थिक दृष्टय़ा मदत करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोफत गॅस कनेक्शनच्या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत.
या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत?
या योजनेचा प्रमुख उद्देश गरीब कुटुंबांचा स्वयंपाक घरातील खर्च कमी करण्यात मदत करणे हा आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला वर्षातून तीन मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत. ज्या कुटुंबाकडे आधीपासूनच दोन गॅस कनेक्शन आहेत, त्यांना वर्षातून सहा मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहेत.
या योजनेतून लाभ घेण्यासाठी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, राशन कार्ड, बँक खाते तपशील (प्रत), पॅन कार्ड आणि विज बिल किंवा रहिवासी दाखला या कागदपत्रांची आवश्यकता असेल.
या योजनेच्या लाभार्थींचे व्यक्तिगत माहिती सरकार सुरक्षित ठेवणार असून योजनेचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचविला जाईल.
या योजने करता पात्रता कशी ठरविली जाते?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले निकष खालीलप्रमाणे आहेत:
- लाभार्थी हा कुटुंब दारिद्र रेषेखालील असावा.
- लाभार्थी कुटुंबाकडे वैद्य रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- कुटुंबामधील कोणाच्याही नावावर LPG कनेक्शन नसावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे.
या योजनेचे फायदे काय आहेत?
- नागरिकांची आर्थिक बचत: मोफत गॅस कनेक्शन गरीब कुटुंबाचा स्वयंपाक घरातील खर्च कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
- महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम: लाकूड तसेच कोळसा वापरून स्वयंपाक करणाऱ्या महिलांना श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. मात्र एलपीजी गॅसच्या मोफत वितरणामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना वर्षातून मोफत तीन गॅस सिलेंडर वितरित करण्यात येणार आहेत. सरकारने योजनेसंबंधीचे अंतिम आदेश लवकरच जारी केले जातील. त्यानंतर वरील पात्रते अनुसार नागरिकांना हे मोफत गॅस सिलेंडर वितरित केले जाणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी नागरिक गॅस एजन्सीमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही गरीब कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी राबविली जाणारी महत्त्वाची पाऊल आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांचा स्वयंपाक घरातील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच महिलांच्या आरोग्याचेही रक्षण होणार आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र गरीब कुटुंबे पुढे येत आहेत.